शांताबाई जनार्दन शेळके

जन्म : १२ ऑक्टोबर १९२२
मृत्यु : ०६ जून २००२
कार्यक्षेत्र : कवयित्री, लेखिका, संगीतकार, बाल साहित्य लेखिका

साहित्य क्षेत्रात आणखी एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे शांताबाई जनार्दन शेळके इंदापूर गावी जम्नालेल्या शांताबाईंनी पुण्यात शिक्षण घेऊन पुढे आचार्य अत्र्यांच्या “नवयूग” मध्ये ५ वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापक म्हणून काम केले.

सामान्य कुटुंब, घरची बेताची परिस्थिती, या सर्व विपरीत स्थितीत जगरीत सांभाळत हि मुलगी शिकली. इंदापूर सारख्या ग्रामीण वातावरणातून थेट पुण्यनगरी गाठत शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

मराठी आणि देव भाषा संस्कृत हे विषय घेत संपूर्ण विश्वविद्यालयात सर्वप्रथम येणे यात नाविन्य होते. आणि हे करताना ‘न चि केळकर’ आणि ‘चिपळूणकर’ हि दोन मानाची सुवर्णपदके या कर्तृत्वाला जणू सुवर्ण झळाळीच आणत होती.

शांताबाईनी स्वत:च वर्णन केल्याप्रमाणे ‘विशिष्ट अनुभूतीची स्मारके आणि विशिष्ट आकांक्षांची चित्रे ’असे त्यांच्या कवितांचे स्वरुप आहे. शांता शेळके या कवयित्री म्हणून प्रसिद्ध असल्या तरी त्यांनी अनेक कथा व कांदबर्‍या लिहिल्या आहेत. शांता शेळके यांनी बालसाहित्य देखील लिहिले आहे. आळंदी येथे १९९६ मध्ये संपन्न झालेल्या एकोणसत्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा सन्मान लाभला आहे.