श्रावणमासी हर्ष मानसी

कवी : बालकवी श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडेक्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासेमंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडेतरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहापूर्ण नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रूप … Read more

आनंदी आनंद गडे

कवी : बालकवी आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडेवरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरेनभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरलामोद विहरतो चोहिकडे…… आनंदी आनंद गडे सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहेखुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणेमेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरलेइकडे, तिकडे, चोहिकडे…… आनंदी आनंद गडे वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षततीपक्षी मनोहर कूजीत … Read more

औदुंबर

कवी : बालकवी ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊननिळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडेशेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे पायवाट पांढरी तयातुन अडवीतिडवी पडेहिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे झाकळुनी जळ गोड काळिमा पसरे लाटांवरपाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर