
जन्म : २३ ऑगस्ट १९१८
मृत्यु : १४ मार्च, २०१०
कार्यक्षेत्र : कवी, लेखक, नाटककार आणि समिक्षक
गोविंद विनायक करंदीकर उर्फ “विंदा करंदीकर” हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. त्यांनी त्यांचे शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले. “हैदराबाद मुक्ती संग्रामात” भाग घेतला आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. कोकणच्या आर्थिक मागासलेपणाबद्दल ते संवेदनशील होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते मार्क्सवाद असा त्यांचा वैचारिक प्रवास राहिला असला तरी पण कोणत्याही संघटनेचे सभासद कधीच नव्हते.
साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेचा “ज्ञानपीठ पुरस्कार” मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. हा पुरस्कार त्यांना त्यांच्या “अष्टदर्शने” या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार देण्यात आले.