
जन्म : १० जुलै, १९१३
मृत्यु : १२ फेब्रुवारी, १९९८
कार्यक्षेत्र : कवयित्री, लेखिका, नाटककार
पद्मा गोळ्यांचा जन्म तासगाव येथील पटवर्धन राजघराण्यात झाला. पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयातून एम.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत त्यांचे शिक्षण झाले.
त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रीतिपथावर हा १९४७ साली प्रकाशित झाला. कवितासंग्रहांशिवाय त्यांनी रायगडावरील एक रात्र, स्वप्न (१९५५), नवी जाणीव या नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली वाळवंटातील वाट नावाची कादंबरीही प्रकाशित झाली.