शब्दांना जर बीज म्हंटले,
तर हे साहित्य म्हणजे एक सृष्टी !
या सर्वांचे संकलन म्हणजे विश्व जणू !
आणि या विश्वाला सामावण्याची शक्ती आहे ती एकट्या विधात्याकडेच.
“वाटसरू” या प्रवासाच्या माध्यमातून काही निवडक शब्द-बीज, रोपटी आणि वटवृक्ष संगोपित आणि संरक्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
एकीकडे पर्यावरणाचा विचार करत असताना “Think Green” चा concept घेऊन आपण digital होत असतांना, या साहित्याचा ऱ्हास होऊ नये हाच आमचा मानस आहे.
शब्द व्यक्त झाले तर भावना, काव्यात माळले कि मोतीच जणू आणि साहित्यात जडले कि हिऱ्याची खाण, कधी ज्ञानामृत तर कधी अनुभव, सारे सारे काही शब्दच ! आणि कित्येक वर्षांची तपश्चर्या करून या शब्दांवर प्रभुत्व मिळवणारे लेखक, कवी, साहित्यिक यांच्या कलेची अगाध गंगा अविरत वाहत राहावी आणि हि सृष्टी अशीच बहरत राहावी म्हणून वाटसरुचा हा एक छोटासा प्रयत्न !
- विष्णु वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)
- गोविंद विनायक करंदीकर (विंदा करंदीकर)
- इंदिरा संत
- अरुणा ढेरे
- चिंतामणी त्र्यंबक खानोलकर (आरती प्रभू)
- शांताबाई जनार्दन शेळके
- इलाही जमादार
- माणिक सीताराम गोडघाटे (कवी ग्रेस)
- केशवसुत
- बाळ सीताराम मर्ढेकर
- मंगेश केशव पाडगांवकर
- त्र्यंबक बापूजी ठोंबरे (बालकवी)
- बहिणाबाई चौधरी
- ग. दि. माडगूळकर (गदिमा)
- पद्मा गोळे