
जन्म : १ डिसेंबर, १९०९
मृत्यु : २० मार्च, १९५६
कार्यक्षेत्र : कवी व लेखक
बाळ सीताराम मर्ढेकर यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते.
दुसर्या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जीवनात जी नीरसता व कृत्रिमता आली अणि युद्धात जो मानवसंहार झाला तो पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यावर काही उपाय नसल्यामुळे त्यांच्या मनातील विफलता काव्यातून उमटली. याचमुळे मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते.
बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले.