इंदिरा संत

जन्म : ४ जानेवारी, १९१४
मृत्यु : १३ जुलै, २०००
कार्यक्षेत्र : कवयित्री, लेखिका

इंदिरा संत यांचा जन्म जानेवारी ४, १९१४ रोजी कर्नाटकातील इंडी या गावी झाला, त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव “इंदिरा दीक्षित”. पेश्याने शिक्षीका असलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे.