पूर्णविराम
कवयित्री : इंदिरा संत अर्ध-स्वल्प-विरामांचेरेंगाळणे जीव घेत;उद्गाराची तशी कांडीउगा जीव भुलवीत ! प्रश्नचिन्हाचा हा हूकगळा घालतो संकट;अर्धस्फुट रेषेमाजीवादळाची घुसमट ! वाटे तुला शिकवावेआता एक-एक चिन्ह :अर्ध्याअपु-या वाक्याशीपूर्णविरामाची खूण !