डोळ्यांतल्या डोहामध्ये
कवी : विंदा करंदीकर डोळ्यांतल्या डोहामध्येखोल खोल नको जाऊ;मनांतल्या सावल्यांनानको नको, सखे, पाहू; जाणीवेच्या गाभा-यातजाऊ नको एकटीने ;गेलेल्यांना साधले काव्यथेवीण मागे येणे ? व्यथेच्या या पेल्यांतूनसत्याचे जे घेती घोट,पूस त्यांना कसा कांपेपिता पिता धीट ओठ !