कोलंबसाचे गर्वगीत

कवी : कुसुमाग्रज हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारेविराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविताआणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतानजमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी … Read more

सागर

कवी : कुसुमाग्रज आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळेनिळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे फेसफुलांचे सफ़ेद शिंपित वाटेवरती सडेहजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो कितीदंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबतेदेश दूरचे बघावयाला जावेसे वाटते तुफान केव्हा भांडत येते सागरही गर्जतोत्या वेळी मी चतुरपणाने … Read more

संस्कृती

कवी : कुसुमाग्रज अखेरत:संस्कृती म्हणजेमाझ्या मनाचं सामर्थ्यजे अपार आहेत्याला किनारा घालण्याचं.विश्वात्मक ईश्वरतेलामंदिराचा… मूर्तीचा…मृत्युच्या अतीर सागरालामोक्षाचा… भक्तीचाप्रेमाच्या मुक्त उर्मिलानात्याचा… सक्तीचा…हि संस्कृतीमला तरते आहेमारतेही आहे.

माझ्या मराठी मातीचा

कवी : कुसुमाग्रज माझ्या मराठी मातीचालावा ललाटास टिळाहिच्या संगाने जागल्यादर्‍याखोर्‍यातील शिळा हिच्या कुशीत जन्मलेकाळे कणखर हातज्यांच्या दुर्दम धीरानेकेली मृत्यूवरी मात नाही पसरला करकधी मागावयास दानस्वर्णसिंहासनापुढेकधी लावली न मान हिच्या गगनात घुमेआद्य स्वातंत्र्याची द्वाहीहिच्या पुत्रांच्या बाहूतआहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातीचालावा ललाटास टिळाहिच्या संगे जागतीलमायदेशांतील शिळा

माझे जगणे होते गाणे

कवी : कुसुमाग्रज जाता जाता गाईन मीगाता गाता जाईन मीगेल्यावरही या गगनातीलगीतांमधुनी राहीन मी माझे जगणे होते गाणेकधी मनाचे कधी जनाचेकधी घनाशय कधी निराशयकेवळ नाद तराणे आलापींची संथ सुरावळवा रागांचा संकर गोंधळकधी आर्तता काळजातलीकेव्हा फक्त बहाणे राईमधले राजस कूजनकधी स्मशानामाधले क्रंदनअजणातेचे अरण्य केव्हाकेव्हा शब्द शहाणे जमले अथवा जमले नाहीखेद खंत ना उरले काहीअदृष्यातील आदेशांचेओझे फक्त … Read more

पुतळे

कवी : कुसुमाग्रज तुमचे हार पोचलेजयघोष पोचलेकल्पनेतही नसलेलेलष्करी कुर्निसातही पोचले. फासावर चढतानासंसार जळतानारक्त सांडतानाआमचे एक स्वप्न होते. रंकांच्या माथ्यावरील छपरचेउघड्या अंगावरील वस्त्रांचेउपाशी पोटातील अन्नाचे,स्वातंत्र्याच्या सफलतेचे. घोष विरल्यावर, दिवे विझल्यावरमध्यरात्रीच्या निवांतातगिधाडांचे थवे आलेत्या स्वप्नाचे तुकडे चोचीत घेऊन – तेही पोचले.

पाचोळा

कवी : कुसुमाग्रज आडवाटेला दूर एक माळतरु त्यावरती एकला विशाळआणि त्याच्या बिलगूनिया पदासजीर्ण पाचोळा पडे तो उदास उषा येवो शिंपीत जीवनासीनिशा काळोखी दडवु द्या जगासीसूर्य गगनातुनि ओतु द्या निखारामूक सारे हे साहतो बिचारा तरुवरची हसतात त्यास पानेहसे मुठभर ते गवतही मजेनेवाटसरु वा तुडवीत त्यास जातपरि पाचोळा दिसे नित्य शांत आणि अंती दिन एक त्या वनांतयेई … Read more

नदीच्या तीरावर

कवी : कुसुमाग्रज गावाबाहेरच्या निर्जनात नदीच्या तीरावरलव्हाळे भरलेल्या खडकावर बसूनतो पाहत होता अविचलसायंकालीन सावल्यांतमालवणा-या प्रवाहाकडेसूर्यास्ताचे स्मरणकाळजात ठेवणा-या ढगाकडेहरवला होता तोपंखातून गळलेल्या पिसासारखाअसंबंधित…मी विचारलेतू कोण आहेस?तो हसून उत्तरला…मी तूच आहे! आपण अविभक्ततरीही(तुजमजमध्ये परी केवढी ही दरी)आपण दुभंगलो आहोतअपार-अजिंक्य अंतरानेतू तुझ्या वाटेने जाक्षितिजावरल्या दिव्यांच्या त्या रोषणाईकडेसंमर्द,संस्मिताकडे,चक्राच्या गतीकडे मी…येथेच बसून राहणार आहेया खडकावरकालातीत.

नट

कवी : कुसुमाग्रज नांदीनंतरपडदा उघडलातेव्हा मी तुडुंब भरलेला होतोहजारो रंगीबेरंगी शब्दांनी,शरीरभर रोरावणा-याअसंख्य आविर्भावांनीभीतींनी, आशांनी, अपेक्षांनी;आता भरतवाक्य संपल्यावरप्रयाणाची तयारी करीतमी उभा आहेरंगमंचावर, एकटा,समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेचसंपूर्ण रिकामा. मी उच्चारलेलेकाही शब्द, अजूनहीप्रेक्षालयातील धूसरमंदप्रकाशित हवेवरपिंजारलेल्या कापसासारखेतरंगत आहेत,माझे काही आविर्भावरिकाम्या खुर्च्यांच्या हातांना,बिलगून बसले आहेत,मी निर्माण केलेलेहर्षविमर्षाचे क्षणपावसाने फांद्दांवर ठेवलेल्याथेंबांसारखेभिंतींच्या कोप-यावरथरथरत आहेतअजूनही.हा एक दिलासामाझ्या रितेपणाला,नाटक संपल्याची खंत-ती आहेच.नाटक नव्हे, तीन तासांचेएक अर्करूप … Read more

तूर्त

कवी : कुसुमाग्रज होय,तुमची खानदानी प्रवचनंछानच आहेततुमचे रेशीमकाठी वादविवादतेही श्रवणीय मननीयआणि माननीयही आहेततुमच्या पायापाशी बसूनमी सारं ऎकेनखूप काही शिकेनहीपण तूर्त माझ्या सन्मित्रांनो,रजा द्या मलापलिकडच्या जंगलामध्येहिमलाटेत कुडकुडणार्‍यात्या नागड्या पोरांकडेमला जायचं आहेत्यांच्या अंगणातजाळ पेटवण्यासाठी