मी घरात आले

कवयित्री : पद्मा गोळे उंबऱ्यावरचे माप सांडूनमी आत, घरात आले,दोन डोळ्यांतली ज्योत झाले,माझे डोळे खाली वळले.भुई म्हणाली, ‘तू माझी!काढ केर, स्वच्छ कर.’मी म्हटलं, ‘खरंच गं आई’केरसुणी झाले, रांगोळी झाले. चूल म्हणाली, ‘तू माझी.’मी तिची लाकडं झाले.जातं म्हणालं, ‘तू माझी.’गहू झाले, ज्वारी झाले.उखळीतलं भात झाले;ताकातली रवी होऊनमथणीत नाचत राहिले. भिंत होऊन, छप्पर होऊन,गुपितं राखली, छिद्रं झाकली;पणती, वात, … Read more

आठवणी

कवयित्री : पद्मा गोळे मनात आठवणी गर्दी करतात तेव्हाह्सतमुखानं त्यांना या म्हणावं;ऊंची, मखमली, आसनं देऊनप्रेमानं बसा म्हणावं;स्थानापन्न झाल्या की हळूच विचारावं,काय घेणार ?त्याही बेट्या मिस्कील ;निष्पाप बालपणाचा आव आणून विचारतील,काय देणार ?मोकळेपणानं उत्तर द्यावंमागाल ते तुमचंच…मग एक हळूच म्हणेल, डोळे द्या,पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे —दुसरी म्हणेल, हात द्यान धरता आम्हाला पकडून ठेवणारे —तिसरी म्हणेल, शब्द … Read more

सकाळी उजाडता उजाडता

कवयित्री : पद्मा गोळे सकाळी उजाडता उजाडता उठले, पाहिलं….. आणि कमालच! एक वीट निखळलेली.मी उचलून लावली ती जिथल्या तिथे.पुन्हा चार दिवसांनीपूर्वा लाल व्हायच्या आधीच उठले, पाहिलं,तर अर्ध्याअधिक विटा उचकटून फेकलेल्या ! पुन्हा माझी कारागिरी!पुन्हा काही दिवसांनीमध्यरात्रीच जाग आली, पाहिलं :थडगं पूर्ण उस्कटलेलं ! आणि उघडलेल्या शवपेटीतमन चक्क डोळे चोळीतउठून बसलेलं!तसं रडतच होतं म्हणा. पण जिवंत?अकल्पनीय! म्हणजे … Read more