अल्लड माझी प्रीत

कवी : ग. दि. माडगूळकर (गदिमा) अल्लड माझी प्रीत, तिला ना रीत जगाची ठावेआवडेल तो मित्र करावा त्याच्यासंगे गावे अशी असावी सांज साजिरी, असा असावा वाराएक सवंगडी संगे यावा छेडित छेडित तारासूर पहाडी, बोल रांगडे मुखात माझ्या यावे तरू शिरावरी एक असावा फुले पडावी माथीएक सावळा हात असावा लोभसवाण्या हातीचहू दिशांनी फुले फुलावी धुंद सुगंधे … Read more

दुबळी माझी झोळी

कवी : ग. दि. माडगूळकर (गदिमा) पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी,देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी, हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी,चोचीपुरता देवो दाणा माय माउली काळी, एक वीतिच्या वितेस पुरते तळ हाताची थाळी,देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी, महाल गाद्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया,गरजेपुरती देई वसने जतन कराया काया, गोठविनारा नको कडाका … Read more

एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख

कवी : ग. दि. माडगूळकर (गदिमा) एका तळ्यात होती बदके पिले सुरेखहोते कुरूप वेडे पिल्लू तयात एक कोणी न तयास घेई खेळावयास संगेसर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोकआहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशीभावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी जे ते तयास टोची दावी उगाच … Read more