
जन्म : १ मार्च १९४६
मृत्यु : ३१ जानेवारी २०२१
कार्यक्षेत्र : साहित्यिक
इलाही जमादार (जन्म : दुधगाव-सांगली) हे एक मराठी गझलकार आहेत. उत्तुंग गझलकार सुरेश भटांच्या नंतर त्यांचेच नाव घेतले जाते. हा महान कवी पुण्यात एका आऊटहाऊसच्या छोटया खोलीत राहतो. पुस्तकांचा आणि मांजरांचा पसारा एवढा की, खोलीत पाय ठेवायला जागा नसते. तरीही इलाहींचा प्रत्येक मित्राला घरी बोलावण्याचा आग्रह असतो. खोली लहान असली तरी या कवीचे मन मोठे आहे. प्रत्येक मित्राला त्यांनी मनाच्या दालनात ऐसपैस जागा दिली आहे.
इलाही जमादार यांनी १९६४ सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी आहेत. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत. ते गझल क्लिनिक ही नवोदित मराठी कवींसाठी गझल कार्यशाळा घेतात.