आठवणींचे कोंदण

आयुष्याच्या अंगठी मधील आठवणींच्या कोंदणात जर कोणाला बसवायचे असेल तर ती व्यक्ती सुद्धा हिऱ्यासारखी मौल्यवान असावी लागते. त्या व्यक्तीशी जुळलेले आपले ऋणानुबंध म्हणजे हिऱ्याला पाडलेले पैलू. हे पैलू जितके उत्कृष्ठ असतील तितकीच त्या हिऱ्याची (नात्याची) किंमत वाढत जात असते. आणि दोघांच्या नात्यामधील विश्वासार्हता म्हणजे त्या कोंदणाची घट्ट पकड. आणि तीच सगळ्याच महत्वाची…..जेवढे ऋणानुबंध आणि विश्वासार्हता … Read more

भ्रष्टाचार आणि देव

भ्रष्टाचार म्हणजे काय ? एखादे काम करण्यासाठी त्याबदल्यात अवैध्यरित्या मोबदला घेणे. बरोबर ना ??? मग जर हाच नियम लागू असेल तर… जगातील सगळ्यात भ्रष्टाचारी व्यक्तिमत्व कोण माहिती आहे ? देव….. हो हो बरोबर वाचलत, देव….. जसा सरकारी बाबू लाच घेतल्याशिवाय काम करत नाही तसा देव सुद्धा नवस आणि उपास-तापास केल्याशिवाय ईच्छित फळ देत नाही. अविवाहितांनी … Read more

गणेशोत्सव आणि दर्शनासाठी भक्ताचा आटापिटा

लिहिल्याशिवाय रहावले नाहि म्हणून लिहितोय…………… जे सुज्ञवाचक शनिवारी (२६ सप्टेंबर २०१५) रात्री लालबागला गेले असतील त्यांना नक्किच कळेल मी काय आणि कश्याबद्दल बोलतोय ते…. प्रसंग पहिला……………..जवळपास ११-११:३० झाले होते, “लालबागच्या राजा” चे दर्शन १२ वाजता बंद होणार होते, त्यामुळे सगळयांची घाई झालेली दर्शन घेण्याची. आम्हीपण घुसलो त्या गर्दिमध्ये…. त्यावेळी, अक्षरश: दोन भिन्न टोकाचे अनुभव आले … Read more

आठवणीतला पाऊस

माझ्या “आठवणीतला पाऊस”एकदा तरी अनुभवून बघभिजलेले ते सुंदर क्षणकधीतरी माझ्या नजरेतून जगून बघ कुंद त्या वातावरणात जेव्हाकाहुर माजेल तुझ्या मनामध्येनकळत का होईनातेव्हा……आयुष्यच थांबेल त्या क्षणामध्ये गुंफत आठवणींचे धागेझेलशील जेव्हा पाऊस-पाणीउरातील कोलाहाल ओघळेलमग आसवे बनूनी करड्या पुंजक्यातून डोकावणारीती सोनेरी किरणे पाहूनक्षणभर का होईनापण नक्किच…….शहारेल तुझे मन धुंद हवा, गंध नवागर्द धुके हे आठवणींचेअनुभवता हा ॠतु सोहळास्मरतील … Read more

धर्म म्हणजे काय?

धर्म म्हणजे काय? खरं म्हणायचे झाले तर याचा खरा अर्थ मला सुद्धा अजुनपर्यंत कळलेला नाही. एकाच धर्माच्या अनेक लोकांना मी यासंदर्भात प्रश्न विचारले, उत्तरेही मिळाली…. पण ती माझ्यादृष्टीने पुरती समाधानकारक नव्हती. एकाच प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या कुवतीनुसार वेगवेगळे दिल्यामुळे माझ्यातरी मनामध्ये संभ्रम तयार झाला आहे. असे का झाले ? धर्म एक… पण त्याची विचारसरणी प्रत्येक … Read more

काळाच्या पानांचा संदर्भ

काळाची पाने उलटता येतात पण फाडून फेकून नाही देता येत. भविष्यात जेव्हा नविन वादळ येईल आणि पानांची उलथापालट होईल, त्यावेळी कदाचित इतिहासातील एखादे विस्मृतीत गेलेले पान समोर येईल. पण त्यावेळेस त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि संदर्भ वेगळे असतील, नव्हे ते तसे असावेत. कारण त्यामुळेच ती घटना घडण्यामागचा उद्देश समोर येण्याची खरी शक्यता असेल. अन्यथा, जर … Read more

निसर्ग नियम आणि आपण…

निसर्ग आपणांस अनेक गोष्टी शिकवतो. पण त्यासाठी आपला दृष्टीकोन सकारात्मक आणि तटस्थ हवा. कारण त्या शिवाय आपण त्या गोष्टीमधील मतीतार्थ नाही समजावून घेऊ शकत. पूर्वी पण मी म्हणालो होतो की, आपण कधीही आणि कोणत्याही गोष्टी पूर्वगृहीत दृष्टीने पाहिल्यास त्यातील फक्त दोष अथवा फक्त गुण दिसतात. पण त्याचा घटनेचा सारासार विचार नाही करु शकत. आता हेच … Read more

शैक्षणिक अवस्था

आजकाल शिक्षणाच्या बाबतीत जे वाक्य सर्रास ऐकवयास मिळते ते म्हणजे, “आजकाल शिक्षणाचा नुसता बाजार मांडलाय“. असेलही, पण हा बाजार कोणी आणि कोणासाठी मांडलाय? आता अनेकजण म्हणतील की, शाळांनी. हो हेही मान्य! पण, या बाजाराला मान्यता कशी मिळाली? प्रोत्साहन कोणी दिले? हा बाजार फोफवण्यास मदत कोणी केली? याचे उत्तर म्हणजे “पालक”. मग याचा दोष शाळांवर का … Read more