
जन्म : २७ फेब्रुवारी, १९१२
मृत्यु : १० मार्च, १९९९
कार्यक्षेत्र : कवी, लेखक, नाटककार आणि समिक्षक
वि.वा. शिरवाडकर म्हणजे आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे असे एक व्यक्तिमत्व. त्यांच्या “कुसुमाग्रज“ या नावाची ख्याती अशी काही पसरली कि लहान-थोर सर्वच त्यांच्या शब्दांच्या मोहात पडू लागले. “सामाजिक अन्याय” व “विषमता” या विषयांवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली. “साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे” या मताचा त्यांनी पुरस्कार केला. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते.
त्यांचा जन्म दिवस हा “मराठी भाषा दिन“ म्हणून साजरा केला जातो.