बहिणाबाई चौधरी

जन्म : २४ ऑगस्ट, १८८०
मृत्यु : ३ डिसेंबर, १९५१
कार्यक्षेत्र : कवयित्री

बहिणाबाईंचा जन्म असोदे (जळगाव जिल्हा ) ह्या गावी नागपंचमीच्या दिवशी झाला. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या.

त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. लिहिता न येणाऱ्या बहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचत व त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत.

कृपया, बहिणाबाई चौधरी आणि संत बहिणाबाई यामध्ये गल्लत करू नका.