होय,
तुमची खानदानी प्रवचनं
छानच आहेत
तुमचे रेशीमकाठी वादविवाद
तेही श्रवणीय मननीय
आणि माननीयही आहेत
तुमच्या पायापाशी बसून
मी सारं ऎकेन
खूप काही शिकेनही
पण तूर्त माझ्या सन्मित्रांनो,
रजा द्या मला
पलिकडच्या जंगलामध्ये
हिमलाटेत कुडकुडणार्या
त्या नागड्या पोरांकडे
मला जायचं आहे
त्यांच्या अंगणात
जाळ पेटवण्यासाठी