निसर्ग आपणांस अनेक गोष्टी शिकवतो.
पण त्यासाठी आपला दृष्टीकोन सकारात्मक आणि तटस्थ हवा. कारण त्या शिवाय आपण त्या गोष्टीमधील मतीतार्थ नाही समजावून घेऊ शकत. पूर्वी पण मी म्हणालो होतो की, आपण कधीही आणि कोणत्याही गोष्टी पूर्वगृहीत दृष्टीने पाहिल्यास त्यातील फक्त दोष अथवा फक्त गुण दिसतात. पण त्याचा घटनेचा सारासार विचार नाही करु शकत.
आता हेच बघा ना, जेव्हा पानझड होते त्यावेळेस आपल्यातील सगळेच जण हळवे होतो दु:खी होतो. सर्वांनाच आयुष्यात घडलेल्या उदासिन घटना आठवतात…. कारण ? आपण त्याच्याकडे त्या नजरेने बघतो.
पण याच जागी असा विचार करा ना कि …..
ही पानझड झाली म्हणूनच उद्या नविन पालवी फुटणार आहे… जर पानझड झाली नाही तर नविन पालवी कशी आणि कुठे फुटणार?
सुर्यास्त होतो तो नविन सुर्योदयाची चाहूल घेऊनच… समुद्राच्या पाण्याचे बाष्पिकरण झाल्याशिवाय पाऊस नाही पडत…
इतका मोठा निसर्ग या घटनांना अपवाद नाही ठरु शकत तर तुम्ही कसे ठरणार ?
आयुष्यात वाईट घटना घडत असतात पण याचा अर्थ असा नव्हे की संपूर्ण आयुष्यच वाईट आहे.
“अपयश” या शब्दाचा उल्लेख करताना अनाहूतपणे का होईना आपण “यशाचा” उल्लेख करतच असतो.
शेवटी यश म्हणजे काय हो ? सकारत्मक विचारांचे मूर्त स्वरुप.