काळाच्या पानांचा संदर्भ

काळाची पाने उलटता येतात पण फाडून फेकून नाही देता येत.

भविष्यात जेव्हा नविन वादळ येईल आणि पानांची उलथापालट होईल, त्यावेळी कदाचित इतिहासातील एखादे विस्मृतीत गेलेले पान समोर येईल. पण त्यावेळेस त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि संदर्भ वेगळे असतील, नव्हे ते तसे असावेत. कारण त्यामुळेच ती घटना घडण्यामागचा उद्देश समोर येण्याची खरी शक्यता असेल. अन्यथा, जर आपण पूर्वगृहीत दृष्टीने पाहिल्यास जुनाच (कदाचित) चुकीचा अर्थ आपण लावत राहू.

जसे, निसर्गाकडे पाहताना जर हिरवा चष्मा घातला तर निसर्ग हिरवागार दिसतो, आणि जर काळा चष्मा घातला तर काळोख दिसतो.

त्याच प्रमाणे भविष्याकडे पाहताना भूतकाळाचा चष्मा उतरावा लागतो, कारण त्याशिवाय उज्ज्वल भविष्याची स्वप्ने नाही बघता येत.

Leave a Comment