गाणं सांगू येतं कुठून?

कवी : मंगेश पाडगांवकर


गाणं असतं वाऱ्याचं,
पहाटेच्या ताऱ्याचं.

गाणं शब्दांत मावत नाही,
हावऱ्या हातात गावत नाही.

गाणं पक्षी वाचत जातं,
स्वतःतच नाचत जातं.

गाणं सांगू येतं कुठून?
डहाळीतून ओंकार फुटून.

गाणं प्राणांत रुजू येतं,
हिरवंगार भिजून येतं.

सगळं सगळं गाण्याचं,
आम्हाळ जसं पाण्याचं.