तुला कधीच कळले नाही, ह्या प्रीती मागचे कारण काय,
मी म्हणायचो, “तू मला आवडतेस”; तू हसून म्हणयचीस, “त्यात काय” ?
तुला भेटण्यासाठी प्रत्येक क्षणी आतुर असायचो,
भर दिवसा आठवणीनं मध्ये तुझ्या, मी रंगून जायचो
काय होतयं, हे माझेच मला कळत नव्हते,
बोलायला गेलो तुझ्याशी तर शब्दच कमी पडत होते
तुझ्या डोळ्यांत दिसते मला, माझ्या स्वप्नातले गाव,
ठाऊक नाही मला, तुझ्या नि माझ्या नात्याला देऊ कुठले नाव ?
खरंच का गं तुला कधीच कळले नाही, ह्या प्रीती मागचे कारण काय,
एकदा सांगून तरी दे, तुझ्या मनात नेमकं आहे तरी काय, आहे तरी काय ?