तुझ्यासारखा मित्र, जीवनात एक तरी असावा,
एकट्या मनाचा, तो एक रमणीय विसावा,
तुझ्यासारखा मित्र, जीवनात एक तरी असावा,
मनमोकळे हसायला, तो एक समुद्र किनारा,
तुझ्यासारखा मित्र, जीवनात एक तरी हवा,
नात्यांच्या बंधाला, तो देई एक अर्थ नवा,
तुझ्यासारखा मित्र, जीवनात एक तरी हवा,
आठवणींच्या गाठोड्यातला, तो एक अविस्मरणीय ठेवा,
तुझ्यासारखा मित्र, जीवनात एक तरी जपावा,
आपलंसं म्हणणारा, तो करी एक निरपेक्ष इशारा,
तुझ्यासारखा मित्र, जीवनात एक तरी जपावा,
‘कर जे आवडते तुला’, एक वाक्य आवर्जून म्हणणारा.
खरंच, असा एक तरी तुझ्यासारखा मित्र, प्रत्येकाच्या जीवनात असावाच…