नशिबावर प्रेम

तुमच्या पैकी बरेच जणांनी Amor Fati हा वाक्यांश ऐकला असेल. Latin भाषेतल्या ह्या वाक्यांशाचा अर्थ ‘स्वत:च्या नशिबावर प्रेम’ असा आहे.

Amor Fati ला स्वीकृती म्हणजे नेमकं काय ? प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांच्या मनाविरुद्ध काही न काही घडत असतं. मग ती न आवडणारी, नुकसानदायी असली तरीही त्या घडलेल्या गोष्टीची खंत न करता त्याची स्वीकृती करणे, म्हणजेच Amor Fati ला मनापसून स्विकारणे.

असेल त्या परिस्थितीत नशिबाला स्वीकृती, आपल्या पुढील आयुष्य सकारात्मकपणे जगण्याचं धैर्य देते. ह्या जगात कुठलीच गोष्ट शाश्वत नाही, अगदी आपले संकटं सुध्दा कायमस्वरूपी नसतात. तुमच्या लक्षात आलंच असेल की आपले जीवन पण क्षणिकच आहे. असे माहित असताना, अश्या गोष्टींवर का बरं चिंताग्रस्त व्हावं? ज्यांचा असण्या नसण्याने काही वर्षांनंतरही काहीच फरक पडणार नाही!

कोणत्याही परिस्थितीला स्वीकृती, सकारात्मक भावना निर्माण करते, जीवनाला आशावादी बनवते. ह्याला, फक्त एक अनुभव म्हणून घ्या. आपण आपल्या सभोवतालच्या गोष्टी आणि लोकांशी सहजपणे भावनात्मकतेने जोडले जातो आणि तेच आपल्याला आपले जग वाटू लागते. तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की आपण ह्यांच्याशिवाय कसे जगु शकतो? याचे उत्तर येत्या पुढील वर्षांमध्ये मिळेलच… त्यांच्या शिवाय तुम्ही आजही ठीकच आहात आणि नंतरही असणार, कारण परिस्थिती नुसार आपले प्राधान्य बदलते.

जो आहे त्या नशिबावर प्रेम करतो त्याच्यासाठी काहीच अशक्य नसते, कठीण परिस्थितीलाही तो सहज सामोरे जायचे धैर्य ठेवतो.

म्हणूनच म्हणतात ना,
“Where there is a will, there is a way.”
“Nothing is impossible in life. It might be difficult and may even take time but it is possible.”

जीवनात सकारात्मक ध्येय ठेवण्यासाठी, सस्नेही कडून शुभेच्छा!

Leave a Comment