मैत्री

मैत्री केली तेव्हा जाणवलं,
दोघांत साम्य असे काही नव्हतं,
तरी एकमेकांच्या सोबतीत,
वेळ निघुन जात असत

आपापसात जिव्हाळा होता फार,
जसे आहोत तसा केला एक दुसऱ्याचा स्वीकार,
विसरूनी दोघांचा भूतकाळ,
हसतो ठेंगणं दिसेस तोवर आभाळ

समजूत दोघांतली आहे पक्की,
एक अडखळला तर दुसरा सावरले नक्की,
कधी कधी शब्द कमी पडायचे आनंद व्यक्त करायला,
तर कधी मुकपणा ही चालून जातो एक दुसऱ्याला समजून घ्याला

निखळ प्रितीने गुंफली आहे आमची मैत्री,
वियोग असला, तरी ही गुंफण अतूट राहणार ह्याची खात्री,
आमच्या मैत्रीचे बंध निराळे,
त्यात सामावले आहे विश्व सारे

आता जाणवतय, अनोखं असतं हे मैत्रीचं नातं,
जशी वेळ सरते, तसं हे नातं पण घनिष्ठ होत जातं.

मैत्रीच्या ह्या नात्यासाठी सस्नेही शुभेच्छा…

Leave a Comment