जाईन दूर गावा

कवी : आरती प्रभू तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवाघरदार टाकुनी मी जाईन दूर गावा पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीनचमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरीयावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा. देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारेसाराच आसमंत घननीळ होत जावा. पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो,शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा. तारांवरी पडावा … Read more

सांगेल राख माझी

कवी : आरती प्रभू संपूर्ण मी तरू की आहे नगण्य पर्णसांगेल राख माझी गेल्यावरी जळून. खोटी खरी दुधाची होती कशी बिजे ती,बरसून मेघ जाता येईल ‘ते’ रुजून. रानी कुठून आलो? गाऊन काय गेलो?वेळूत संध्यावेळी येईल ते कळून. लागे मला कशाची केव्हा कशी तहान :चर्चा कशास? नाव काठास की अजून. कोणा फुले दिली मी, माळून कोण … Read more

ये रे घना ये रे घना

कवी : आरती प्रभू ये रे घनाये रे घनान्हावूं घालमाझ्या मना फुलें माझीअळुमाळूवारा बघेचुरगळूं नको नकोम्हणतांनागंध गेलारानावना टाकुनिया घरदारनाचणार नाचणारनको नको म्हणतांनामनमोर भर रानां नको नको किती म्हणूवाजणार दूर वेणुबोलावतो सोसाट्याचावारा मला रसपाना

दुःख ना आनंदही

कवी : आरती प्रभू दुःख ना आनंदही अन्‌ अंत ना आरंभहीनाव आहे चाललेली कालही अन्‌ आजही मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसामी नव्हे की बिंब माझे ! मी न माझा आरसा याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबतीनाद आहे या घड्याला अन्‌ घड्याच्या भोवती सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवानाव आहे चाललेली, … Read more

तो एक राजपुत्र

कवी : आरती प्रभू तो एक राजपुत्र, मी मी एक रानफूलघालीन मी, मी त्याला सहजिच रानभूल केसात पानजाळी, कंठात रानवेलतुझी रे तुझी नटून ताई, घालील त्यास माळ भाऊ रे शूर अती, होईल सेनापतीभाऊ रे भाऊ करून स्वारी, दुष्टास चारील धूळ होईल बाबा प्रधान, राखील तो इमानसुखी रे सुखी राज्य सारे चुटकीत तो करील

एकाच एकाच वेळे

कवी : आरती प्रभू एकाच एकाच वेळे दोघांचे डोळेदाटून दाटून आले; वाहूं न गेले जळत जळत दिवा विझत गेलाझाकत झाकत हवा पाऊस आला भरले दोघांनी पेले, ओठांशी नेलेकाळोख गर्जत आले नदी नी नाले कोणत्या दोन त्या लाटा जवळ आल्यावाकड्या हृदयलाटा जोडीत बाहूंत बंदिस्त केला प्रत्येक दीसअसाच फुलांचा झाला केवळ वास एकाच एकाच वेळे दोघांचे डोळेदाटून … Read more