तळघर
कवी : कुसुमाग्रज ती हसत होती.. सैरभैरतेव्हा त्या हास्याच्या पायर्या उतरुनमी खाली गेलो.. खोलवरआणि पोहोचलो,एका तळघराशी. तळघर होतं सुबकसंगमरवरीताजमहालाच्या तळघरासारखं;आणि तिथल्याप्रमाणे इथेहीहोती एक छोटीशी कबर गुलाबांच्या पाकळ्यांनी झाकलेलीधुपाच्या दाट सुगंधात वेढलेलीझुलत्या दिव्यांच्या मंद प्रकाशातसंध्याकालीन पाणकमळासारखीमिटुन पडलेलीआणि मग माझ्या लक्षात आलेतिचे सैरभैर हसणेम्हणजे एक ताजमहालच होते.