किती तरी दिवसांत

कवी : बाळ सीताराम मर्ढेकर किती तरी दिवसांतनाही चांदण्यात गेलोकिती तरी दिवसांतनाही नदीत डुंबलो खुल्या चांदण्याची ओढआहे माझी ही जुनीचआणि वाहत्या पाण्याचीशीळ ओळखीची तीच केव्हा तरी चांदण्यातपुन्हा जाईन निर्भय;गांवाकाठच्या नदीतहोईन मी जलमय आज अंतरात भीतीखुल्या चांदण्याची थोडीआणि नदीचा प्रवाहअंगावर काटा काढी बरा म्हणून हा ईथेदिवा पारवा पाऱ्याचाबरी तोतऱ्या नळाचीशिरी धार, मुखी ऋचा

पिपांत मेले ओल्या उंदिर

कवी : बाळ सीताराम मर्ढेकर पिपांत मेले ओल्या उंदिर;माना पडल्या, मुरगळल्याविण;ओठांवरती ओठ मिळाले;माना पडल्या, आसक्तीविण.गरिब बिचारे बिळांत जगले,पिपांत मेले उचकी देउन;दिवस सांडला घाऱ्या डोळींगात्रलिंग अन धुऊन घेउन.जगायची पण सक्ती आहे;मरायची पण सक्ती आहे. उदासतेला जहरी डोळे,काचेचे पण;मधाळ पोळेंओठांवरती जमलें तेंहीबेकलाइटी, बेकलाइटी!ओठांवरती ओठ लागले;पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!

गणपत वाणी

कवी : बाळ सीताराम मर्ढेकर गणपत वाणी बिडी पितानाचावायाचा नुसतीच काडी;म्हणायचा अन मनाशीच कीया जागेवर बांधिन माडी; मिचकावुनि मग उजवा डोळाआणि उडवुनी डावी भिवयी,भिरकावुनि ती तशीच ध्यायचालकेर बेचव जैसा गवयी. गि~हाईकाची कदर राखणे;जिरे, धणे अन धान्यें गळित,खोबरेल अन तेल तिळीचेविकून बसणे हिशेब कोळित; स्वप्नांवरती धूर सांडणेक्वचित बिडीचा वा पणतीचामिणमिण जळत्या; आणि लेटणेवाचित गाथा श्रीतुकयाचा. गोणपटावर विटकररंगीसतरंजी … Read more

दवांत आलीस भल्या पहाटे

कवी : बाळ सीताराम मर्ढेकर दवांत आलीस भल्या पहाटीशुक्राच्या तोऱ्यात एकदा,जवळुनि गेलिस पेरित अपुल्यातरल पावलांमधली शोभा अडलिस आणिक पुढे जराशीपुढे जराशी हसलिस; – मागेवळुनि पाहणे विसरलीस का?विसरलीस का हिरवे धागे? लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,सुंदरतेचा कसा इशारा;डोळ्यांमधल्या डाळिंबांचासांग धरावा कैसा पारा! अनोळख्याने ओळख कैशीगतजन्मीची द्यावी सांग;कोमल ओल्या आठवणींचीएथल्याच जर बुजली रांग! तळहाताच्या नाजुक रेषाकुणि वाचाव्या, कुणी … Read more