“प्रीत तुझी स्मरावी”
का फक्त आठवणीच्या हिंदोळ्यावरच
साथ तुझी उरावी ….
कधी प्रातः काळी कधी सांजवेळी,
प्रतिदिन प्रीत तुझी स्मरावी …..!! १ !!
कधी अडचण कधी दडपण ,
कधी कर्तव्याची जाण तर
कधी प्रेमाचे आंदण ,
शोधता शोधता , तळहातावरच्या
रेषानाही , साथ नशिबाची मिळावी ….
कधी प्रातः काळी कधी सांजवेळी,
प्रतिदिन प्रीत तुझी स्मरावी …..!! २ !!
क्षण असे विरले काही ,
भान कशाचे उरले नाही ,
सरता सरता काळ काही
असा सरुनी गेला ,
गर्द लाल मेहंदीचा गंध उडुनी गेला ,
सुख दु:खाला, सहवासाची
नक्षी मात्र उरावी …..
कधी प्रातः काळी कधी सांजवेळी,
प्रतिदिन प्रीत तुझी स्मरावी …..!! ३ !!
नजर तुझी नजर माझी ,
एकमेकांना चुकवत काही ,
तिनेही आंधळी कोशिंबीर खेळावी
साद मनाची साद मनाला
काही अशी कळावी ……
कधी प्रातः काळी कधी सांजवेळी,
प्रतिदिन प्रीत तुझी स्मरावी …..!! ४ !!
तुझे येणे स्वप्न , तुझे जाने सत्य ,
तुझा सहवास स्वप्न , तुझे नसणे सत्य ,
का विरहाच्या डोहावरती पुन्हा
आशेची किरणे पसरावी ……
कधी प्रातः काळी कधी सांजवेळी,
प्रतिदिन प्रीत तुझी स्मरावी …..!! ५ !!
प्रीत तुझी का इतकी हळवी ,
जितका दूर तितकी भुलवी ,
घटीत माझे ऐकुनी ,
श्रोता माझा का व्याकूळ व्हावा !
हितासाठी माझ्या त्याने पुन्हा
ईश्वरा विनंती करावी
आणि मी …….
पुन्हा ……
कधी प्रातः काळी कधी सांजवेळी,
प्रतिदिन प्रीत तुझी स्मरावी ….. !! ६ !!
कधी प्रातः काळी कधी सांजवेळी,
प्रतिदिन प्रीत तुझी स्मरावी …..