अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी
भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी
फुलले पुन्हापुन्हा हा केला गुन्हा जगाचा
ना जाहले कुणाची पत्त्यामधील राणी
येता भरून आले, जाता सरून गेले
नाही हिशेब केले, येतील शाप कानीं
आता न सांध्यतारा करणार रे पहारा
फुलणार नाही आता श्वासांत गूढ गाणीं
शापू तरी कशाला या बेगडी जगाला
मी कागदी फुलांनी भरतेच फूलदाणी