तळघर

कवी : कुसुमाग्रज ती हसत होती.. सैरभैरतेव्हा त्या हास्याच्या पायर्‍या उतरुनमी खाली गेलो.. खोलवरआणि पोहोचलो,एका तळघराशी. तळघर होतं सुबकसंगमरवरीताजमहालाच्या तळघरासारखं;आणि तिथल्याप्रमाणे इथेहीहोती एक छोटीशी कबर गुलाबांच्या पाकळ्यांनी झाकलेलीधुपाच्या दाट सुगंधात वेढलेलीझुलत्या दिव्यांच्या मंद प्रकाशातसंध्याकालीन पाणकमळासारखीमिटुन पडलेलीआणि मग माझ्या लक्षात आलेतिचे सैरभैर हसणेम्हणजे एक ताजमहालच होते.

जोगीण

कवी : कुसुमाग्रज साद घालशीलतेव्हाच येईनजितकं मागशीलतितकच देईन दिल्यानंतरदेहावेगळ्यासावलीसारखीनिघून जाईन. तुझा मुगुटमागणार नाहीसभेत नातंसांगणार नाही माझ्यामधल्यातुझेपणातजोगीण बनूनजगत राहीन.

काही बोलायाचे आहे

कवी : कुसुमाग्रज काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाहीदेवळाच्या दारामध्ये, भक्‍ती तोलणार नाही माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटेपण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूजपरि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेलात्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरीत्याचा कोष किनार्‍यास कधी लाभणार नाही … Read more

कणा

कवी : कुसुमाग्रज ओळखलत का सर मला ! पावसात आला कोणी ?कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला , बोलला वरती पाहूनगंगामाई पाहुनी आली गेली घरट्यात राहून माहेरवाशिन पोरीन सारखी चार भिंतीत नाचलीमोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेलेप्रसाद म्हणुनी पापण्यान मध्ये पाणी थोडे ठेवले कारभारनीला … Read more

एकदा ऐकले काहींसें असें

कवी : कुसुमाग्रज एकदा ऐकले काहींसें असेंअसीम अनंत विश्वाचे रणत्यात हा पृथ्वीचा इवला कणत्यांतला आशिया भारत त्यांतछोट्याशा शहरीं छोट्या घरांत घेऊन आडोसा कोणी ‘मी’ वसेंक्षुद्रता अहो ही अफाट असें!भिंतीच्या त्रिकोनी जळ्मट जाळीबांधून राहती कीटक कोळी तैशीच सारी ही संसाररीतीआणिक तरीही अहंता किती?परंतु वाटलें खरें का सारें?क्षुद्र या देहांत जाणीव आहेजिच्यात जगाची राणीव राहे! कांचेच्या गोलांत … Read more

अजुनही

कवी : कुसुमाग्रज निळ्या जांभळ्या नदीलाआंबेवनाची सावलीभेट पहिलीवहिलीअकल्पिता । … भेट दूरस्थपणाचीगर्भरेशमी क्षणाचीसौदामिनीच्या बाणांचीदेवघव । गुलबक्षीच्या फुलांनीगजबजले कुंपणेवेचू लागला श्रावणमोरपिसे । ओल्या आभाळाच्या खालीइद्रचापांचे तुकडेतुझा करपाश पडेजीवनास । कधी रेताडीचे रस्तेकधी मोहरली बागकधी प्रासादास आगकर्पुराच्या । सप्तसुरातुनी गेलेमाझ्या जीवनाचे गीततुझ्या सारंगीची तातसाथ झाली । बर्फवाट शिशिराचीआता पुढलिया देशीतुझ्या मिठीची असोशीअजूनही ।

ऋण

कवी : कुसुमाग्रज पदी जळत वालुकावर उधाणलेली हवाजळास्तव सभोवतीपळतसे मृगांचा थवा पथी विकलता यदाश्रमुनि येतसे पावलातुम्हीच कवी हो, दिलामधुरसा विसावा मला ! अहो उफळला असेभवति हा महासागरधुमाळुनि मदांध याउसळतात लाटा वर, अशा अदय वादळीगवसता किती तारवेप्रकाश तुमचा पुढेबघुनि हर्षती नाखवे ! असाल जळला तुम्हीउजळ ज्योति या लावताअसाल कढला असे,प्रखर ताप हा साहता, उरात जखमातलीरुधिर-वाहिनी रोधुनीअसेल … Read more