तुझ्या आठवणी म्हणजे,
चेहऱ्यावरचे स्मित हास्य
तुझ्या आठवणी म्हणजे,
भावनांच्या कोड्यातले रहस्य
तुझ्या आठवणी म्हणजे,
फुल पाकळीचा कोमल स्पर्श
तुझ्या आठवणी म्हणजे,
हृदयात उमलणारा सुखद हर्ष
तुझ्या आठवणी म्हणजे,
पावसाच्या पहिल्या धारा
तुझ्या आठवणी म्हणजे,
समुद्र किनाऱ्यावरचा मंजुळ वारा
तुझ्या आठवणी म्हणजे,
साऱ्यात दिसते तुझेच नाव
तुझ्या आठवणी म्हणजे,
स्वप्नातले एक सुदंर गाव
तुझ्या आठवणी म्हणजे,
मला देई जगण्याची आशा
तुझ्या आठवणी म्हणजे,
न बोलता कळालेली भाषा
तुझ्या आठवणी म्हणजे,
गालातल्या गालात लाजणं
तुझ्या आठवणी म्हणजे,
पावसात ओले चिंब भिजणं
तुझ्या आठवणी म्हणजे,
पडून परत उगमणारी समुद्राची लाट
तुझ्या आठवणी म्हणजे,
क्षितिजाकडे नेणारी सुगम वाट
तुझ्या आठवणीं विना,
आयुष्य बेरंग आहे
तुझ्या आठवणींचा ठेवा,
हाच माझ्या आयुष्याचा रंग आहे…..!!!