तुझी नी माझी मैत्री निखळ नात्याची खूण असावी,
गैरसमजला कुठेही जागा नसावी,
दूरावा असलाच तरी विचारांची जवळीक असावी,
अहंकाराला मात्र कधीही वाट नसावी,
जन्मो जन्मीची साथ असावी,
कोणाला नाव ठेवायला संधी नसावी,
विश्वासाची पायरी आपल्या मैत्रीची ताकद असावी,
मृगजळा सारखी आपल्यात समजूत नसावी,
सुखं दुखात भागीदारी असावी,
संकोच व शंकेची शक्यता नसावी,
अशी दृढ आपली मैत्री असावी…