वडील

बोट धरुनी ज्यांनी चालवले,
तयांनी अंगाखांद्यावर वाढविले.

घराचे रक्षक ते, मुखिया ही तेच,
वरून जरी असले कठोर,
तरी आतून मायेचा अथांग सागर …..

पुस्तक धरून ज्यांनी शिकवले,
शिस्त लावून त्यांनीच जग दाखविले,

स्वतःसाठी नाही तर, कुटुंबासाठी झटतात ते,
शरीलाला विश्रांती न देता,
स्वप्न आमुचे साकार करण्यासाठी राबतात ते

लहान सहान संकटांना ‘आई गं’ म्हणून आपुले भागते,
पण मोठे संकट येई तेव्हा, उद्गारतोच आपण ‘बाप रे’

जसे आईला असते महत्व, तसे पित्याला हि असावे,
अश्या ह्या पित्याला अंतःकर्णात प्रेमाने रुजवावे …..

पितृदिनाच्या निमित्त सर्व बाबांना समर्पित———

Leave a Comment