आयुष्य खूप सुदंर आहे
म्हटलं तर एक कोडं आहे
ज्याला हे कळालं, तो समाधानी आहे
विचार कराल तितकं थोडं आहे
बाळाच्या हास्यात, झाडाच्या पालवित,
पावसाच्या थेंबात, फुलांच्या कळीत,
पहा, आयुष्य किती सुंदर आहे
विचार कराल तितकं थोडं आहे
नात्यांच्या बंधात, मायेच्या स्पर्शात,
मैत्रीच्या ओढात, प्रेमाच्या आलिंगनात,
पहा, आयुष्य किती सुंदर आहे
विचार कराल तितकं थोडं आहे
आयुष्य क्षणिक असले तरी, सुंदर आहे
नेमके जगावे कसे, हे मात्र एक रहस्य आहे
ते क्षणोक्षणी जगण्यातच आनंद आहे
ज्याने असे आयुष्य जगलं, तो निरंतर आहे
पटतंय ना,
आयुष्य खूप सुंदर आहे, विचार कराल तितकं थोडं आहे