रोज रात्री नऊ वाजता, आकाशाकडे जेव्हा मी पाहते,
दिसते मजला, चंद्राच्या प्रकाशात जणू तारीका नाहते
वाऱ्याच्या झुळुकेचा तो हळुवार स्पर्श,
जो आहे खास, त्याच्या स्मरणाचा होतो हर्ष
त्या चंदेरी चंद्राची भासणारी ती मंद उष्णता,
विचारांनी येई चेहऱ्यावर खुलून प्रसन्नता
खळखळत्या नदीचा तो मनमोहक आवाज,
त्या पाण्यात रहस्यमयी चंद्राचा होई आभास
झुळुक वाऱ्याची करी माझ्यात चैतन्य जागे,
जणू विळखा घालीत आहे हाथ जीवलगाचे
प्रल्हादायी वाटे मला ते क्षण,
जसे की दोन जिवांचं होतंय मिलन…