कोरा कागद

कवयित्री : अरुणा ढेरे


कोरा कागद
अन्‌ शाईच्या काही रेषा…
बाकी जसच्या तस आहे…
बदललेत ते थोडेफार चेहरे…
फ्रॉक मधल्या साडीवर आल्यात
पदर सावरता सावरता
अल्लडपणाही सावरायला शिकल्यात…
गच्चीवरुन “ती”चं घर दिसत नाही
मधेच डीश टीव्हीची छत्री येते…
भूतकाळही नसतो आपला.
आझान अन्‌ आरती एकाच वेळेस ऐकायला येते आजही…
पण कर्कश अन्‌ प्रचारकी झालेत राम अन्‌ रहीम.
विट्टी दांडूच मैदान
विटांनी भरलेलं दिसतयं
मला खेळात खिचणारा राम्या
आता रेती उपसतो त्याच मैदानात…
एस.टी महामंडळ जसच्या तसं…
खिडक्यातून दिसणारे काही दृश्य बदललेत…;
मला कविता लिहायचीये म्हणून बदल दिसतोय असही नाही
बदल दिसतोय असही नाही
फक्त मी मुर्खासारखं
रोमॅन्टीक होण सोडलं नाहीये.

Leave a Comment