काय होते?
इतक्या असंख्य सद्भावना
जन्म घेतात मनामध्ये,
अनोळखी माणसांसाठी
सुद्धा किती भरुन येते
पंख फुटल्या अंगाने
शुभेच्छा येतात वस्तीला
या सार्यांचे नंतर काय होते?
एका तरी फुलाचे मरण
लांबते का एखादा क्षण?
एकटे पोळणारे दु:ख
अनिकेत
येते का सांत्वनाच्य
सावलीत?
करुणेनं भिजतो का थोडा
निर्दयतेचा काठ?
थांबते का एखादी
विनाशाची लाट?
सगळे भवतालच मोडून,
चिरडून चाललेले
पाचोळ्यासारखे झालेले
कुठलेही नाते
मनातल्या सद्भावांचे नि
शुभेच्छांचे
खरेच मग काय होते?