डोळ्यांतल्या डोहामध्ये

कवी : विंदा करंदीकर डोळ्यांतल्या डोहामध्येखोल खोल नको जाऊ;मनांतल्या सावल्यांनानको नको, सखे, पाहू; जाणीवेच्या गाभा-यातजाऊ नको एकटीने ;गेलेल्यांना साधले काव्यथेवीण मागे येणे ? व्यथेच्या या पेल्यांतूनसत्याचे जे घेती घोट,पूस त्यांना कसा कांपेपिता पिता धीट ओठ !

रुचिपालट

कवी : विंदा करंदीकर तो चंद्र छाटो काहिही अन सूर्य काहीही भको;मातीच पायाखालती, नाते तिचे विसरू नको. आत्मास आत्म्याचे मिळे; ते कोण घेईल काढुनी?पण इंद्रिया दरडावुनी शरिरास तू हिणवू नको मोठ्यास मोठे मान तू, त्याहून मोठे चिंतता;पण आपणाही फार छोटे तू उगा मानू नको खोटा गळा काढू नको; खोटा टिळा लावू नको;जीव जडतो त्या ठिकाणी … Read more

मागु नको सख्या जे

कवी : विंदा करंदीकर मागु नको सख्या, जे माझे न राहिलेलेते एक स्वप्‍न होते स्वप्‍नात पाहिलेले ! स्वप्‍नातल्या करांनी, स्वप्‍नातल्या तुला मीहोते न सांग का रे सर्वस्व वाहिलेले ? स्वप्‍नात वाहिलेले म्हणुनी कसे असत्यस्वप्‍नास सत्य असते सामील जाहलेले स्वप्‍नातल्या परीला स्वप्‍नात फक्‍त पंखदिवसास पाय पंगू अन्‌ हात शापिलेले स्वप्‍नात परीला स्वप्‍नात ठेवुनी जाहे नेत्र घेऊनि … Read more

त्याला इलाज नाही

कवी : विंदा करंदीकर धिक्कारिली तरीही सटवीस लाज नाहीश्रद्धा न पाठ सोडी त्याला इलाज नाहीदेवातुनी जगाला ज्याने विमुक्त केलेत्यालाच देव करिती त्याला इलाज नाहीलढवून बांधवांना संहार साधणारागीता खुशाल सांगे त्याला इलाज नाहीतत्त्वज्ञ आणि द्रष्टे खंडून एकमेकाकथिती विरुद्ध गोष्टी त्याला इलाज नाहीते भूत संशयाचे ग्रासून निश्चितीलाछळते भल्याभल्यांना त्याला इलाज नाहीविज्ञान ज्ञान देई निर्मी नवीन किमयानिर्मी न … Read more

तेच ते…

कवी : विंदा करंदीकर सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते ! तेच ते !!माकडछाप दंतमंजन,तोच चहा तेच रंजनतीच गाणी तेच तराणे,तेच मूर्ख तेच शहाणेसकाळपासुन रात्रीपर्यंततेच ते तेच ते खानावळीही बदलून पाहील्याकारण जीभ बदलणं शक्य नव्हतं.काकू पासून ताजमहाल,सगळीकडे सारखेच हालनरम मसाला, गरम मसाला,तोच तो भाजीपालातीच ती खवट चटणी,तेच ते आंबट सार सुख थोडे दु:ख फारसंसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघुळेत्या … Read more

चुकली दिशा तरीही

कवी : विंदा करंदीकर चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारेवेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे मी चालतो अखंड चालायाचे म्हणूनधुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचेहे शीड तोडले की अनुकूल सर्व वारे! मग्रूर प्राक्तनांचा मी फाडला नकाशाविझले तिथेच सारे ते मागचे ईशारे चुकली दिशा तरीही आकाश एक आहेहे जाणतो तयाला … Read more

किलबिललेले उजाडताना

कवी : विंदा करंदीकर किलबिललेले उजाडतानाओठ उगवतीचा थरथरलागुलाबलेला ओललालसरतुडुंबलेलेसंथ निळेपणपसरत गेले चार दिशांनातांबुसवेडेहळुहळु मग नि:स्तब्धातुनस्वप्ने उडली गुलाल घेऊनलालचुटकश्या चोचीमध्येपिंजर-पंखी,आणिक नंतरआपखुशीने अभ्र वितळलेउरले केशरआणि भराभरउधळण झाली आकाशावरआकारांचीरंगदंगल्यानाहि उमगलेकेव्हा सरला रजतराग हाही अस्ताई,आणि उमटला रौप्यतरणाझगमगणार्‍या जलद लयीतील… असा विसरलो, बिसावलो अन्‌नीरवतेच्या गुप्त समेवरआणिक नंतरन कळे कैसीमनात माझ्या –काहि न करता –जाणिव भरली कृतार्थाची

असेच होते म्हणायचे तर

कवी : विंदा करंदीकर असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का ?अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का ? असेच होते म्हणायचे तर वरवर फसवे हसलिस का ?स्वप्‍नाला चुरडून मिठीतच पुन्हा तयावर रुसलिस का ? असेच होते म्हणायचे तर उगाच खोटे रडलीस का ?भरात येऊन भलत्यासलत्या करांत माझ्या शिरलिस का ? असेच होते … Read more

अर्धीच रात्र वेडी

कवी : विंदा करंदीकर अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणीभोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणीफुलले पुन्हापुन्हा हा केला गुन्हा जगाचाना जाहले कुणाची पत्त्यामधील राणीयेता भरून आले, जाता सरून गेलेनाही हिशेब केले, येतील शाप कानींआता न सांध्यतारा करणार रे पहाराफुलणार नाही आता श्वासांत गूढ गाणींशापू तरी कशाला या बेगडी जगालामी कागदी फुलांनी भरतेच फूलदाणी