मैत्रिण

कवयित्री : शांता शेळके स्वप्नातल्या माझ्या सखीकोणते तुझे गाव?कसे तुझे रंगरुपकाय तुझे नाव? कशी तुझी रितभात?कोणती तुझी वाणी?कसे तुझ्या देशामधलेजमीन, आभाळ, पाणी? लव्ह्याळ्याच्या मुळांतूनझिरपताना पाणीत्यात पावले बुडवून तू हीगुणगुणतेस का गाणी? सुगंधित झुळका चारकेसांमध्ये खोवूनतू ही बसतेस ऊन कोवळेअंगावर घेऊन? काजळकाळ्या ढगांवरअचल लावून दृष्टीतू ही कधी आतल्याआतखूप होतेस कष्टी? कुठेतरी खचित खचितआहे सारे खास,कुठेतरी आहेस … Read more

ये रे घना ये रे घना

कवी : आरती प्रभू ये रे घनाये रे घनान्हावूं घालमाझ्या मना फुलें माझीअळुमाळूवारा बघेचुरगळूं नको नकोम्हणतांनागंध गेलारानावना टाकुनिया घरदारनाचणार नाचणारनको नको म्हणतांनामनमोर भर रानां नको नको किती म्हणूवाजणार दूर वेणुबोलावतो सोसाट्याचावारा मला रसपाना

दुःख ना आनंदही

कवी : आरती प्रभू दुःख ना आनंदही अन्‌ अंत ना आरंभहीनाव आहे चाललेली कालही अन्‌ आजही मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसामी नव्हे की बिंब माझे ! मी न माझा आरसा याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबतीनाद आहे या घड्याला अन्‌ घड्याच्या भोवती सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवानाव आहे चाललेली, … Read more

तो एक राजपुत्र

कवी : आरती प्रभू तो एक राजपुत्र, मी मी एक रानफूलघालीन मी, मी त्याला सहजिच रानभूल केसात पानजाळी, कंठात रानवेलतुझी रे तुझी नटून ताई, घालील त्यास माळ भाऊ रे शूर अती, होईल सेनापतीभाऊ रे भाऊ करून स्वारी, दुष्टास चारील धूळ होईल बाबा प्रधान, राखील तो इमानसुखी रे सुखी राज्य सारे चुटकीत तो करील

एकाच एकाच वेळे

कवी : आरती प्रभू एकाच एकाच वेळे दोघांचे डोळेदाटून दाटून आले; वाहूं न गेले जळत जळत दिवा विझत गेलाझाकत झाकत हवा पाऊस आला भरले दोघांनी पेले, ओठांशी नेलेकाळोख गर्जत आले नदी नी नाले कोणत्या दोन त्या लाटा जवळ आल्यावाकड्या हृदयलाटा जोडीत बाहूंत बंदिस्त केला प्रत्येक दीसअसाच फुलांचा झाला केवळ वास एकाच एकाच वेळे दोघांचे डोळेदाटून … Read more

मावळतीला

कवयित्री : शांता शेळके मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरलेजसे कुणाचे जन्मभराचे भान विसरलेजखम जिवाची हलके हलके भरून यावीतसे फिकटले, फिकट रंग ते मग ओसरले. घेरित आल्या काळोखाच्या वत्सल छायादुःखाचीही अशी लागते अनवट मायाआक्रसताना जग भवतीचे इवले झालेइवले झाले आणि मजला घेरित आले. मी दुःखाच्या कुपीत आता मिटते आहेएक विखारी सुगंध त्याचा लुटते आहेसुखदुःखाच्या मधली विरता … Read more

बाभळी

कवयित्री : इंदिरा संत हिरवी हिरवी गार पालवीकाट्यांची वर मोहक जालीघम्घम करती लोलक पिवळेफांदी तर काळोखी काळीकुसर कलाकृती अशी बाभळीतिला न ठावी नागरारीतीदूर कुठेतरी बांधावरतीझुकून जराशी उभी एकटीअंगावरती खेळवी राघूलाघट शेळ्या पायाजवलीबाल गुराखी होऊनिया मनरमते तेथे सांज सकाळीयेते परतून नवेच होऊनलेवून हिरवे नाजूक लेणेअंगावरती माखून अवघ्याधुंद सुवासिक पिवळे उटणे.

कोलंबसाचे गर्वगीत

कवी : कुसुमाग्रज हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारेविराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविताआणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतानजमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी … Read more

सागर

कवी : कुसुमाग्रज आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळेनिळ्याजांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे फेसफुलांचे सफ़ेद शिंपित वाटेवरती सडेहजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो कितीदंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गलबतेदेश दूरचे बघावयाला जावेसे वाटते तुफान केव्हा भांडत येते सागरही गर्जतोत्या वेळी मी चतुरपणाने … Read more

संस्कृती

कवी : कुसुमाग्रज अखेरत:संस्कृती म्हणजेमाझ्या मनाचं सामर्थ्यजे अपार आहेत्याला किनारा घालण्याचं.विश्वात्मक ईश्वरतेलामंदिराचा… मूर्तीचा…मृत्युच्या अतीर सागरालामोक्षाचा… भक्तीचाप्रेमाच्या मुक्त उर्मिलानात्याचा… सक्तीचा…हि संस्कृतीमला तरते आहेमारतेही आहे.