मग उद्याचा दिवस दुसरा असेल
दुसरा आणि वेगळा
मन हरवलेल्या माणसासारखा
वेडा अंधार
आणि शापयस्त पावसाची
ही संततधार
मी वाट पाहते आहे
की या गरगरत अंगावर
येणार्या निराशेला
आता उतार पडेल
मी सहन करते आहे
की सोसता सोसताच मग
रक्त्गोलकांना
लाल विजेचा साक्षात्कार घडेल
मी धरुन ठेवते आहे
प्राणांचे स्वातंत्र्य आणि
जन्मांचे शकून मुकाट
मी समजावते आहे स्वत:ला
की अरुंद असते संभवाची वाट
मी स्वीकारते सगळे जसेच्या तसे
सांभाळून ठेवते स्वत:ची सगळी
गळलेली पिसे
की उद्याचा दिवस दुसरा असेल
दुसरा आणि वेगळा