किती तरी दिवसांत
कवी : बाळ सीताराम मर्ढेकर किती तरी दिवसांतनाही चांदण्यात गेलोकिती तरी दिवसांतनाही नदीत डुंबलो खुल्या चांदण्याची ओढआहे माझी ही जुनीचआणि वाहत्या पाण्याचीशीळ ओळखीची तीच केव्हा तरी चांदण्यातपुन्हा जाईन निर्भय;गांवाकाठच्या नदीतहोईन मी जलमय आज अंतरात भीतीखुल्या चांदण्याची थोडीआणि नदीचा प्रवाहअंगावर काटा काढी बरा म्हणून हा ईथेदिवा पारवा पाऱ्याचाबरी तोतऱ्या नळाचीशिरी धार, मुखी ऋचा