आयुष्य खूप सुदंर आहे

आयुष्य खूप सुदंर आहेम्हटलं तर एक कोडं आहेज्याला हे कळालं, तो समाधानी आहेविचार कराल तितकं थोडं आहे बाळाच्या हास्यात, झाडाच्या पालवित,पावसाच्या थेंबात, फुलांच्या कळीत,पहा, आयुष्य किती सुंदर आहेविचार कराल तितकं थोडं आहे नात्यांच्या बंधात, मायेच्या स्पर्शात,मैत्रीच्या ओढात, प्रेमाच्या आलिंगनात,पहा, आयुष्य किती सुंदर आहेविचार कराल तितकं थोडं आहे आयुष्य क्षणिक असले तरी, सुंदर आहेनेमके जगावे कसे, … Read more

पैठणी

कवयित्री : शांता शेळके फडताळात एक गाठोडे आहेत्याच्या तळाशी अगदी खालीजिथे आहेत जुने कपडेकुंच्या टोपडी शेले शाली त्यातच आहे घडी करुनजपून ठेवलेली एक पैठणीनारळी पदर जरी चौकडीरंग तिचा सुंदर धानी माझी आजी लग्नामध्येहीच पैठणी नेसली होतीपडली होती सा-यांच्या पायाहाच पदर धरून हाती पैठणीच्या अवतीभवतीदरवळणारा सुष्म वासओळखीची.. अनोळखीची..जाणीव गुढ़ आहे त्यास धूर कापूर उदबत्यांतूनजळत गेले किती … Read more

एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख

कवी : ग. दि. माडगूळकर (गदिमा) एका तळ्यात होती बदके पिले सुरेखहोते कुरूप वेडे पिल्लू तयात एक कोणी न तयास घेई खेळावयास संगेसर्वांहुनी निराळे ते वेगळे तरंगे दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोकआहे कुरूप वेडे पिल्लू तयांत एक पिल्लास दु:ख भारी, भोळे रडे स्वतःशीभावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी जे ते तयास टोची दावी उगाच … Read more

खोप्यामधी खोपा

कवयित्री : बहिणाबाई अरे खोप्यामधी खोपासुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला  पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला  सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर तिले जल्माचा सांगाती मिये गण्यागम्प्या नर  खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा तिची उलूशीच चोच तेच दात, तेच ओठ तुले देले रे देवानं दोन हात दहा बोटं 

आनंदी आनंद गडे

कवी : बालकवी आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडेवरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरेनभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरलामोद विहरतो चोहिकडे…… आनंदी आनंद गडे सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहेखुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणेमेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरलेइकडे, तिकडे, चोहिकडे…… आनंदी आनंद गडे वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षततीपक्षी मनोहर कूजीत … Read more

मन वढाय वढाय

कवयित्री : बहिणाबाई मन वढाय वढायउभ्या पीकांतलं ढोर,किती हांकला हांकलाफिरी येतं पिकांवर. मन मोकाट मोकाटत्याले ठायीं ठायीं वाटा,जशा वार्‍यानं चालल्यापान्यावर्‍हल्यारे लाटा. मन लहरी लहरीत्याले हातीं धरे कोन?उंडारल उंडारलंजसं वारा वाहादन. मन जह्यरी जह्यरीयाचं न्यारं रे तंतर,आरे इचू, साप बरात्याले उतारे मंतर ! मन पांखरू पांखरूंत्याची काय सांगूं मात ?आतां व्हतं भुईवरगेलं गेलं आभायांत. मन चप्पय … Read more

औदुंबर

कवी : बालकवी ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊननिळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडेशेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे पायवाट पांढरी तयातुन अडवीतिडवी पडेहिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोहाकडे झाकळुनी जळ गोड काळिमा पसरे लाटांवरपाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर

गवतफुला

कवयित्री : इंदिरा संत रंगरंगुल्या, सानसानुल्या,गवतफुला रे गवतफुला;असा कसा रे सांग लागला,सांग तुझा रे तुझा लळा. मित्रासंगे माळावरती,पतंग उडवित फिरताना;तुला पाहिले गवतावरती,झुलता झुलता हसताना. विसरुनी गेलो पतंग नभिचा;विसरून गेलो मित्राला;पाहुन तुजला हरवुन गेलो,अशा तुझ्या रे रंगकळा. हिरवी नाजुक रेशिम पाती,दोन बाजुला सळसळती;नीळ निळुली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती.मलाही वाटे लहान होऊन,तुझ्याहुनही लहान रे;तुझ्या संगती सडा … Read more

रुचिपालट

कवी : विंदा करंदीकर तो चंद्र छाटो काहिही अन सूर्य काहीही भको;मातीच पायाखालती, नाते तिचे विसरू नको. आत्मास आत्म्याचे मिळे; ते कोण घेईल काढुनी?पण इंद्रिया दरडावुनी शरिरास तू हिणवू नको मोठ्यास मोठे मान तू, त्याहून मोठे चिंतता;पण आपणाही फार छोटे तू उगा मानू नको खोटा गळा काढू नको; खोटा टिळा लावू नको;जीव जडतो त्या ठिकाणी … Read more

मागु नको सख्या जे

कवी : विंदा करंदीकर मागु नको सख्या, जे माझे न राहिलेलेते एक स्वप्‍न होते स्वप्‍नात पाहिलेले ! स्वप्‍नातल्या करांनी, स्वप्‍नातल्या तुला मीहोते न सांग का रे सर्वस्व वाहिलेले ? स्वप्‍नात वाहिलेले म्हणुनी कसे असत्यस्वप्‍नास सत्य असते सामील जाहलेले स्वप्‍नातल्या परीला स्वप्‍नात फक्‍त पंखदिवसास पाय पंगू अन्‌ हात शापिलेले स्वप्‍नात परीला स्वप्‍नात ठेवुनी जाहे नेत्र घेऊनि … Read more